म्हादईच्या सद्यपरिस्थितीस मुख्यमंत्रीच जबाबदार ः कॉंग्रेस

0
259

म्हादईप्रश्‍नी कॉंग्रेस सरकारला जबाबदार धरणार्‍या मुख्यमंत्र्यांनी ‘बोले तैसा चाले’ या म्हणीप्रमाणे तत्कालीन जलसंसाधन मंत्री असलेले फिलीप नेरी रॉड्रीग्ज यांना आपल्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व म्हादईसंबंधी सर्व आकडेवारी व घटनाक्रम देऊन श्‍वेतपत्रिका काढण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे. म्हादईप्रश्‍नी २००६ सालचा कॉंग्रेस सरकारला जबाबदार धरण्याच्या मुख्यमंत्री वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना चोडणकर यांनी सावंत हेच म्हादईच्या सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला.

कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मध्यरात्री केलेल्या आंदोलनामुळेच भाजप सरकारला जाग आली व त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची घोषणा केल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अन्य भाजप मंत्री व नेते यांच्या संगनमताने म्हादईचा दौरा केल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.