मोरजीत समुद्रात बुडून दोघा पर्यटकांचा मृत्यू

0
17

तेंबवाडा-मोरजी येथील समुद्रात दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली. पहिल्या घटनेत पुण्यातील 47 वर्षीय पर्यटकाचा, तर दुसऱ्या घटनेत बंगळुरूतील 50 वर्षीय पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सविस्तर माहितीनुसार, पुणे येथील फैज अहमद हे तीन दिवसांपूर्वी पत्नी फातिमा आणि दोन मुलांसह गोव्यात आले होते. ते मोरजी येथील एका रिसॉर्टमध्ये उतरले होते. मोरजी समुद्रकिनारी काल सकाळी 8.30 च्या सुमारास समुद्रस्नानाचा आनंद घेताना फैज अहमद हे बुडाले. दृष्टीच्या जीवरक्षकांनी त्यांना बाहेर काढले आणि तुयेतील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत मोरजी समुद्रात बंगळुरूतील राजेश शर्मा यांचा देखील बुडून मृत्यू झाला. जीवरक्षकांनी त्यांनाही समुद्रातून बाहेर काढून पेडणे आरोग्य केंद्रात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. राजेश शर्मा हे मोरजी येथे मित्राकडे आले होते.