पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोफत धान्य वितरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण’ योजनेंतर्गत मोफत तांदूळ वितरणाला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही योजना सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. पोषण सुरक्षा वाढवणे हा या मागचा महत्त्वाचा आहे. तसेच या योजनेसाठी केंद्र सरकारने 17 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.