मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू

0
76

>> कृष्णप्पाला लागली लॉटरी

>> अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात

सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
ख्रिस मॉरिस (अष्टपैलू), संघ – राजस्थान रॉयल्स रु. १६,२५,००,०००
काईल जेमीसन (अष्टपैलू), संघ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, रु. १५,००,००,०००
ग्लेन मॅक्सवेल (अष्टपैलू) संघ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, रु. १४,२५,००,०००
झाय रिचर्डसन (गोलंदाज), संघ – पंजाब किंग्ज, रु. १४,००,००,०००
कृष्णप्पा गौतम (अष्टपैलू), संघ – चेन्नई सुपर किंग्ज, रु.० ९,२५,००,०००
रायली मेरीडिथ (गोलंदाज), संघ पंजाब किंग्ज, रु. ८,००,००,०००
मोईन अली (अष्टपैलू), संघ – चेन्नई सुपर किंग्ज, रु. ७,००,००,०००,
शाहरुख खान (अष्टपैलू), संघ – पंजाब किंग्ज, रु. ५,२५,००,०००

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वासाठी काल चेन्नईत खेळाडूंचा लिलाव झाला. त्यात दक्षिण आफ्रिकेच ख्रिस मॉरिस आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थानने १६ कोटी २५ लाखांना विकत घेतले. यापूर्वी हा विक्रम सिक्सर किंग युवराज सिंगच्या नावावर होता.
याशिवाय, न्यूझीलंडचा काईल जेमिसन आणि ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे १५ कोटी आणि १४ कोटींना बंगळुरू व पंजाबच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. तर भारताचा ‘अनकॅप्ड’ अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमलाही लॉटरी लागली असून त्याला चेन्नई सुपर किंग्जने तब्बल ९ कोटी २५ लाख रुपये खर्चुन खरेदी केले आहे.

काल झालेल्या आयपीएल लिलावात एकूण ५७ खेळाडूंवर तब्बल १,४५,३०,००,००० रुपये खर्च करण्यात आले. परंतु बर्‍याच मोठ्या खेळाडूंकडेही फ्रेंचायजींनी दुर्लक्ष केलेले दिसून आले. यंदाच्या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रृेलियाच्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १४.२५ करोड रुपयांची बोली लावत खरेदी केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन हा देखील या लिलावात १४ कोटी इतकी रक्कम मिळवण्यात यशस्वी ठरला. पंजाब किंग्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. रिचर्डसन प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत कधीही न खेळलेला होबार्टचा वेगवान गोलंदाज रायली मरडीथ या आयपीएल लिलावात ‘सरप्राईज पॅकेज’ ठरला. २४ वर्षीय मरडीथला पंजाब किंग्सने तब्बल ८ कोटी रुपयांना खरेदी केले. मरडीथने नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये शानदार कामगिरी केली होती.

कृष्णप्पा गौतम
केली स्पर्धा गाजवणारा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. चेन्नईने त्याच्यावर ९.२५ कोटींची बोली लावली. आता गौतमच्या नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळवणार ‘अनकॅप्ड’ खेळाडू होण्याचा विक्रम जमा झाला.
विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याला त्याच्या २० लाख मूळ रक्कमेसह खरेदी केले आहे.

गोव्याचा सुयश आरसीबी संघात

दरम्यान, बर्‍याच वर्षानंतर गोव्याला आणखी एक आयपीएल खेळाडू गवसला आहे. गोव्याचा अष्टपैलू खेळाडू सुयश प्रभुदेसाई हा आगामी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे. यंदाच्या आयपीएलसाठी गोवा क्रिकेट संघटनेने अमित वर्मा, सुयश प्रभुदेसाई, दर्शन मिसाळ, एकनाथ केरकर, अशोक दिंडा, लक्षय गर्ग, आदित्य कौशिक, स्नेहल कवठणकर आणि दीपराज गावकर यांची नावे पाठवली होती. त्यापैकी सुयश व दीपराजची कालच्या अंतिम बोलीसाठीच्या खेळाडूंत निवड झाली होती. दीपराजसाठी कोणीही खरेदीदार मिळाला नाही. परंतु सुयशने बाजी मारली. आरसीबीने त्याला मूळ बोली रक्कम २० लाखांवर खरेदी केले. त्यामुळे अंतिम अकरात संधी मिळाल्यास स्वप्निल अस्नोडकर व शदाब जकातीनंतर गोव्याकडून आयपीएलमध्ये खेळणारा तिसरा खेळाडू ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत सुयशने शानदार कामगिरी करताना लक्ष्य वेधून घेतले होते. त्याचा फायदा त्याला झाला.

चेन्नई सुपर किंग्ज
कृष्णप्पा गौतम (अष्टपैलू), रु. ९,२५,००,०००
मोईन अली (अष्टपैलू), रु. ७,००,००,०००
चेतेश्वर पुजारा (फलंदाज), रु. ५०,००,०००
के. भगत वर्मा (अष्टपैलू), रु.२०,००,०००
सी हरी निशांत (फलंदाज) रु. २०,००,०००
एम. हरिशंकर रेड्डी (गोलंदाज), रु. २०,००,०००

मुंबई इंडियन्स
नाथन कोल्टर-नाईल (गोलंदाज), रु. ५,००,००,०००
ऍडम मिल्ने (गोलंदाज), रु. ३,२०,००,०००
पीयूष चावला (गोलंदाज), रु. २,४०,००,०००
जेम्स नीशाम (अष्टपैलू), रु. ५०,००,०००
युधवीर चरक (अष्टपैलू), २०,००,०००
मार्को जॅनसेन (अष्टपैलू), रु. २०,००,०००
अर्जुन तेंडुलकर (अष्टपैलू), रु. २०,००,०००

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
काईल जेमीसन (अष्टपैलू), रु. १५,००,००,०००
ग्लेन मॅक्सवेल (अष्टपैलू), रु. १४,२५,००,०००
डॅन ख्रिस्टियन (अष्टपैलू), रु. ४,८०,००,०००
सचिन बेबी (फलंदाज), रु. २०,००,०००
रजत पटिदार (फलंदाज) रु. २०,००,०००
मोहम्मद अझरुद्दीन (यष्टिरक्षक), रु. २०,००,०००
सुयश प्रभुदेसाई (अष्टपैलू) २०,००,०००
कोना श्रीकर भारत (यष्टिरक्षक), रु. २०,००,०००

राजस्थान रॉयल्स
ख्रिस मॉरिस (अष्टपैलू), रु. १६,२५,००,०००
शिवम दुबे (अष्टपैलू), रु. ४,४०,००,०००
चेतन सकारिया (गोलंदाज), रु. १,२०,००,०००
मुस्तफिजुर रहमान (गोलंदाज), रु. १,००,००,०००
लियाम लिव्हिंगस्टोन (अष्टपैलू), रु. ७५,००,०००
के.सी. करियप्पा (गोलंदाज), रु. २०,००,०००
आकाश सिंग (गोलंदाज), रु. २०,००,०००
कुलदीप यादव (गोलंदाज) २०,००,०००

दिल्ली कॅपिटल्स
टॉम करन (अष्टपैलू), रु. ५,२५,००,०००
स्टीव्ह स्मिथ (फलंदाज), रु. २,२०,००,०००
सॅम बिलिंग्स (यष्टिरक्षक-फलंदाज), रु. २,००,००,०००
उमेश यादव (गोलंदाज), रु. १,००,००,०००
रिपाल पटेल (अष्टपैलू) रु. २०,००,०००
विष्णू विनोद (यष्टिरक्षक), रु. २०,००,०००
लुकमान हुसेन मेरीवाला (गोलंदाज), रु. २०,००,०००
एम सिद्धार्थ (गोलंदाज), रु. २०,००,०००

कोलकाता नाईट रायडर्स
साकिब अल हसन (अष्टपैलू), रु. ३,२०,००,०००
हरभजन सिंग (गोलंदाज), रु. २,००,००,०००
बेन कटिंग (अष्टपैलू), रु. ७५,००,०००
करुण नायर (फलंदाज), रु. ५०,००,०००
पवन नेगी (अष्टपैलू), रु. ५०,००,०००
व्यंकटेश अय्यर (अष्टपैलू), रु. २०,००,०००
शेल्डन जॅक्सन (यष्टिरक्षक), रु. २०,००,०००
वैभव अरोरा (गोलंदाज), रु. २०,००,०००

पंजाब किंग्ज
झाय रिचर्डसन (गोलंदाज), रु. १४,००,००,०००
रायली मेरीडिथ (गोलंदाज), रु. ८,००,००,०००
शाहरुख खान (अष्टपैलू), रु. ५,२५,००,०००
मॉइसेस हेन्रिक्स (अष्टपैलू), रु. ४,२०,००,०००
डेव्हिड मलान (अष्टपैलू), रु. १,५०,००,०००
फॅबियन ऍलन (अष्टपैलू), रु. ७५,००,०००
जलाज सक्सेना (अष्टपैलू), रु. ३०,००,०००
सौरभ कुमार (अष्टपैलू), रु. २०,००,०००
उत्कर्ष सिंग (अष्टपैलू), रु. २०,००,०००

सनरायझर्स हैदराबाद
केदार जाधव (अष्टपैलू), रु. २,००,००,०००
मुजीब झद्रान (गोलंदाज), रु. १,५०,००,०००
जे सुचित (गोलंदाज), रु. ३०,००,०००