मूत्र विसर्जनावर ताबा नसणे

0
56
  • डॉ. आरती दिनकर.
    होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक. पणजी

तीन वर्षानंतरच्या वयामध्ये मुलांचा मल-मूत्र यावर ताबा असावयास हवा. तसे न झाल्यास ते या रोगाचे निदर्शक आहे असे समजावे आणि लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्यावर योग्य औषधोपचार करावेत.

मूत्र विसर्जनावर सामान्यपणे लहान मुलांचा ताबा नसतो हे आपल्याला माहीत आहे पण मोठ्या मुलामुलींमध्येही हे क्वचित दिसून येते आणि म्हातार्‍या माणसांमध्येसुद्धा नकळत लघवी होण्याचे प्रमाण आढळते.
लघवीच्या मार्गात होणार्‍या अनेक कारणा्‌ंनी हा विकार उद्भवतो. मुलांमध्ये शिश्न मण्याच्या आच्छादनाचे छिद्र बारीक असणे (फिमोसिस), शौचाच्या जागेवर म्हणजेच गुदकांडात जंत असणे, शिश्न मण्याचे आच्छादन फार लांब किंवा चिकटलेले असणे, लसीका पिंडा (लिंफ ग्लँड)ची वाढ होणे… इत्यादी कारणांनी मूत्रमार्गात अडथळा निर्माण होतो.

वरील कारणांशिवायसुद्धा मूल झोपेत असता त्याला नकळत लघवी होते. झोपेतून उठून त्याला लघवी करावयास लावले तरी ते केव्हा ना केव्हातरी रात्री अंथरूण ओले करतेच. वयात आल्यावरही काही काही मुलांना ह्याचा त्रास सुरूच असतो. काही मुलांना तो इतका कायमचा दडलेला असतो की काहीही केले तरी हा रोग बराच होत नाही. असे आढळते याचे आश्चर्य वाटेल पण माझ्याकडे काही मोठी तरुण मुलं-मुली वयात आल्यावरही त्यांना हा अंथरुणात लघवी होण्याचा त्रास झाल्याची तक्रार घेऊन आलीत. अशा वेळी होमिओपॅथीची औषधे खूप चांगल्या प्रकारे आणि लवकर गुण देतात. लहान मुलांना तर याचा उपयोग होतोच पण मोठ्या मुलांना, म्हातार्‍या माणसा्‌नाही या त्रासातून मुक्तता मिळते
मूल सशक्त असो वा अशक्त या दोघांमध्येही हा नकळत लघवीचा त्रास आढळून येतो. अर्थात अशक्त आणि भित्र्या या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. साधारण पहिली दोन वर्षे मुले अंथरुणातच मलमूत्र विसर्जन करतात. दोन वर्षानंतर मूल आपल्यास शौचास व लघवी होत असल्याचे सांगू शकते आणि त्यावर त्याचा ताबाही राहतो. फार तर अडीच वर्षापर्यंत हे लहान मुलांच्या बाबतीत होऊ शकते, पण यानंतर मात्र मुले झोपेतसुद्धा अंथरुणात लघवी करत नाही. तीन वर्षानंतरच्या वयामध्ये मुलांचा मलमूत्र यावर ताबा असावयास हवा. तसे न झाल्यास ते या रोगाचे निदर्शक आहे असे समजावे आणि लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्यावर योग्य औषधोपचार करावेत. नाहीतर मुले मोठी होत जातात तरी हा त्रास सुरूच राहतो. मेंदूची वाढ न झालेली मुले तसेच शारीरिकदृष्ट्या वाढ न झालेली मुले यांचा नंतरच्या वयातसुद्धा मुलमुत्रावर ताबा राहात नाही व ती नकळत अंथरुणात मलमूत्र विसर्जन करतात.

जननेंद्रियावरील त्वचा मागेपुढे न सरकणे, मुलींमध्ये योनी लिंगाचे दोष असणे, लघवीतून यूरिक ऍसिडसारखे क्षार जाणे, नाकात अंकुर वाढणे, कंपवात, संधिवात, रात्री फिट्स येणे, लहान मुलांना दात येताना… अशा कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. मुत्राशयाच्या द्वारावर असलेली वर्तुळाकार मांसपेशी विकृत होऊन अशक्त होते तेव्हा ही मांस पेशी लघवी धरून ठेवण्याचे काम बरोबर करू शकत नाही व इच्छेशिवाय लघवी होऊन जाते. जास्त गोड पदार्थ खाणार्‍या मुलांमध्ये याचा त्रास होत असलेला आढळतो. खरुज, आगपैण, जननेंद्रियाला खाज सुटणे ही याची कारणे असू शकतात .
अंथरुणात नकळत लघवी होणे किंवा मुत्राशय शैथिल्य यावर मी काही होमिओपॅथिक औषधे देत आहे पण ती होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.

  • अर्जंटीकम नायट्रीकम्, एक्विसेटम्, बेलाडोना कल्केरिया कार्ब, क्लोरल, लायकोपोडीयम, सल्फर, चामोमिला.