मूत्रपिंडाच्या आजारातही रहा आनंदी!

0
231
  • डॉ. शितल लेंगेड

जागतिक किडनी दिन प्रत्येक वर्षी ११ मार्च रोजी किडनीच्या काळजीविषयी जागरूकता निर्माण करणेे या उद्देशाने साजरा केला जातो. यावर्षी किडनी आजार, त्याच्या परिस्थितीला न घाबरता त्याला सामोरे जाऊन सरळ पद्धतीने हाताळणे आणि आनंदी जगणे ह्या मुख्य मुद्यांवर लक्ष केंद्रित केले गेले.

किडनी डायलिसिसचे रुग्ण उपचार घेत असताना निरोगी आयुष्य जगू शकतात. डायलिसिस आपल्या जीवनाचा एक भाग होऊ द्यावा, आपल्या जीवनाचा मुख्य घटक नव्हे. मुख्य म्हणजे जीवन जगण्याचा आनंद गमावू नका.
या दिवसाचे महत्त्व दर्शविण्यासाठी, ओल्ड गोवा येथील हेल्थवे हॉस्पिटलने किडनीच्या आजारांनी ग्रस्त रूग्ण आणि यशस्वी किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांमध्ये परस्पर चर्चासत्र आयोजित केल होतेे. रूग्ण व त्यांच्या कुटूंबियांना रुग्णालयात एकत्र आणून प्रत्यारोपणानंतरची काळजी, डायलिसिस दरम्यान काळजी आणि रूग्णाच्या सामान्य आरोग्याविषयी संभाषण सत्र आयोजित केले होते .

जेव्हा एखाद्याचे मूत्रपिंड (किडनी) निकामी होते किंवा स्टेज ५ क्रॉनिक किडनी रोग (१५ मि.ली./मिनिटापेक्षा कमी ईजीएफआर) होतो तेव्हा किडनी प्रत्यारोपण याचा विचार केला जातो. बहुतेक रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाच्या आधी डायलिसिस उपचार सुरू करणे आवश्यक असते. बाळंतपणाच्या वयातील स्त्रियांमध्ये किडनी प्रत्यारोपण त्यांच्या प्रजननक्षमतेस पुनर्संचयित करते आणि यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता असते. दरम्यान, किडनी निकामी झालेल्या मुलांमध्ये किडनी प्रत्यारोपणानंतरच वाढ आणि विकास साधण्याचा कल असतो.
नुकतीच किडनी प्रत्यारोपण करणारी तरुण सारा हॅरिस म्हणाली, मी अडीच वर्षे डायलिसीसवर होते आणि हे खूप वेदनादायक होते. शेवटी मी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यारोपणाच्या नंतर घरात सहा महिने मर्यादित राहणे, उच्च पातळीवरील स्वच्छता आणि जंक फूड आणि फिझी ड्रिंक नसलेले कठोर आहार यासारखे उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी माझ्या कुटुंबाचा आधार माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. आपणास प्रत्यारोपण करण्याची संधी असल्यास, कृपया पुढे जा.

साराची किडनी देणगीदार तिची आईच होती कारण त्यांचे सॅम्पल जुळले. हॅरिसने प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेद्वारे कौटुंबिक पाठिंब्याचे महत्त्व आणि प्रदानाद्वारे देणगीदार व प्राप्तकर्ता दोघांनाही सकारात्मक राहण्यास प्रोत्साहित करण्याच्या भूमिकेवर भर दिला.

प्रत्यारोपणाच्या नंतर डायलिसिसची आवश्यकता नसते आणि तुलनेने निरोगी व सामान्य आयुष्य जगता येते,
किडनी निरोगी ठेवण्यासाठी आठ नियम आहेत. नियमित व्यायाम, योग्य आहार, द्रवपदार्थ सेवन, धूम्रपान न करणे, तसेच पेन किलर आणि इतर औषधे वापरण्यावर मर्यादा घालणे, सीकेडीपासून दूर राहणे मदत करू शकते. आपली ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियमितपणे तपासून पाहणे व त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हायड्रेशन आणि पुरेसे द्रवपदार्थ घेणे फार महत्वाचे आहे. शिवाय, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणासारखे कोणतेही ‘धोकादायक’ घटक असल्यास आपल्या मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी करा.