मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अद्याप चिंताजनक

0
14

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती मेदांता रूग्णालयाने दिली. दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायमसिंह यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. मुलायमसिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे.

ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून तिथेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे पुत्र सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित आहेत, तर भाऊ शिवपालसिंह यादव हे रोज रुग्णालयात येत आहेत.