मुख्य निवडणूक अधिकार्‍याची बदली करा : कॉंग्रेस

0
30

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल हे निष्पक्षपाती अधिकारी नसल्याने त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी कॉंग्रेस व पक्षाचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. काल गिरीश चोडणकर यांनी ही माहिती दिली.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल हे गेल्या ६ वर्षांपासून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ह्या ६ वर्षांत कधीही त्यांनी निष्पक्षपणे काम केले नसल्याचे कॉंग्रेसने भारतीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.

त्यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी एका निष्पक्षपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. कुणाल यांच्याकडे आणखीही काही खाती असल्यामुळे सतत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचीही भेट घेत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.