मुख्यमंत्र्यांनी घेतला लशीचा पहिला डोस

0
82

संपूर्ण गोमंतकीय जनतेला आत्मविश्वास व पूर्ण संरक्षणाची हमी देत काल बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांनी कोविड लस १०० टक्के सुरक्षित असल्याची हमी गोमंतकीय जनतेला दिली. काल सकाळी दहा वाजता साखळी येथील इस्पितळात मुख्यमंत्र्यांनी लस घेतली. यावेळी परिचारिका विमल सिनारी यांनी मुख्यमंत्र्यांना लस टोचली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यटकांना चाचणी सक्तीची नाही
दरम्यान, राज्यात येणार्‍या पर्यटकांना कोविड चाचणी सक्तीची केली जाणार असल्याची शक्यता मुख्यममंत्र्यांनी फेटाळली. मात्र त्याचवेळी त्यांनी राज्यात येणार्‍या पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहनही केले.

इच्छुकांनी लस घेण्यासाठी
पुढे यावे ः मुख्यमंत्री

कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षित असून जे लोक ही लस घेऊ इच्छितात त्यांनी आपणहून पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी काल केले. यावेळी त्यांनी आपल्याला लस घेतल्यानंतर काहीही त्रास झाला नसून २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेणार असल्याचे स्पष्ट केले.