मुख्यमंत्र्यांच्या बदनामीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याला दंड

0
5

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी केल्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौरव बक्षी याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात माफीनामा सादर केला. तथापि, उच्च न्यायालयाने गौरव बक्षीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावून त्याच्याविरोधात गोवा पोलिसांच्या गुन्हा विभागाने नोंद केलेला गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश काल दिला.

गौरव बक्षी याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप करणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून गोवा पोलिसांच्या गुन्हा विभागाने जुलै 2025 मध्ये गौरव बक्षी याच्याविरोधात बदनामी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

गोवा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी गौरव बक्षी याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी गौरव बक्षी याने कथित बदनामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांची माफी मागितली. तसेच, व्हिडिओ हटविण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.