मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अभियंते, कंत्राटदार लागले कामाला…..

0
7

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते आणि कंत्राटदारांना रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दांत सूचना केल्यानंतर लगेचच विविध ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. मालपे-पेडणे येथे उतारावर पडलेले खड्डे, तर पर्वरीत होली क्रॉस चर्चजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्याचे पाहायला मिळाले.