मुख्यमंत्र्यांचा लसीकरणाचा दावा हास्यास्पद ः चोडणकर

0
26

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी राज्यात १०२ टक्के लसीकरण झाल्याचा केलेला दावा खोटा व हास्यास्पद असल्याची टीका गोवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गरीश चोडणकर यांनी काल केली. भाजप सरकार जनतेला नेहमीच खोटी माहिती देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात १०२ टकके लसीकरण झाले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मात्र उद्या दि. १८ रोजी मोदींशी १०० टक्के खरे बोलण्याची धमक दाखवावी असे आवाहन पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर यांनी दिले.

उद्या पंतप्रधानांशी बोलताना सरपंच, मंत्री तसेच कोविड योद्ध्यांनीही खरे बोलण्याचे धाडस दाखवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी चोडणकर यांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गोवा आर्थिक दिवाळखोरीकडे जात असल्याचा आरोपही केला.