मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले आरोप चुकीचे ः विजय

0
183

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या उत्पन्नाबाबत केलेला आरोप चुकीचा आहे. आपल्या उत्पन्नात आमदार नसताना वाढ झाली होती. तर, आमदार, मंत्रिपदी असताना उत्पन्नात घट झालेली आहे. आपले २०१७ मध्ये उत्पन्न १४.७५ कोटी होते. त्यात ७.३५ कोटीच्या कर्जाचा समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या आपणावर केलेल्या आरोपांबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात जमीन खरेदीबाबत दिलेल्या माहितीच्या आधारावरून त्यांच्यावर जमीन खरेदीबाबत आरोप केला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असेल त्याला आपण जबाबदार नाही. मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांवर दबाब आणण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.