मिझोराममध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन पोलीस शहीद

0
140

मणिपूरच्या ऐजवाल जिल्ह्यातील एका घटनेत काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन सशस्त्र पोलीस शहीद झाले तर पाचजण जखमी झाले. हमर पीपल्स कन्वेंशन या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. पोलीस उपमहानिरीक्षक एल. टी. अरंगचल यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचे काही अधिकारी व महिला आमदार अधिकृत दौर्‍यावर वरील भागात जात असताना हा हल्ला झाला. त्यात मिझोराम पोलीस दलातील एका उपनिरीक्षकासह तिघेजण ठार झाले. तसेच एका उपअधीक्षकांसह पाचजण जखमी झाले.