मान्सूनपूर्व पावसाच दिवसभरात संततधार

0
18

राज्यात शुक्रवारी सकाळपासूनच मान्सूनपूर्व पाऊस संततधार कोसळला. राज्यातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण झाली. चोवीस तासांत राज्यभरात सुमारे पावणे दोन ते दोन इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथे सर्वाधिक २.६५ इंच पावसाची नोंद झाली.

येथील हवामान विभागाने राज्यात गुरुवार आणि शुक्रवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती.
चोवीस तासात वाळपईनंतर पेडणे येथे २.५९ इंच, सांगे येथे २.५३ इंच, मडगाव येथे २.४५ इंच, काणकोण येथे २.१३ इंच पावसाची नोंद झाली. राजधानी पणजीमध्ये १ इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे १.५८ इंच, मुरगाव येथे १.३४ इंच पावसाची नोंद झाली.