माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

0
168

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील मुक्तीनंतरच्या पहिल्या गोवा, दमण व दीव विधानसभेतील (१९६३-६६) आमदार व माजी मंत्री अच्युत काशिनाथ सिनाय उसगांवकर (९२) यांचे काल सकाळी ७.३० वाजता गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात वृद्धापकाळाने निधन झाले. गोव्याच्या पहिल्या विधानसभेतील हयात असलेल्या तिघा आमदारांपैकी ते एक होते. तियोतिनो पेरेरा व कविवर्य गजानन रायकर हे हयात असलेले अन्य दोन आमदार होत.

अच्युत उसगांवकर हे मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते व मुख्यमंत्री बांदोडकर यांच्या निकटवर्ती आमदारांपैकी ते एक मानले जात होते. ते पाळी मतदारसंघाचे आमदार होते. गोवा विधानसभेचे पहिले उपसभापती होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी माणिक, चित्रपट अभिनेत्री कन्या वर्षा उसगांवकर तसेच डॉ. तोषा कुराडे व मनीषा दिनार तारकर या अन्य दोन कन्या असा परिवार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
राज्याचे मुख्यमंत्रीडॉ. प्रमोद सावंत यांनी काल अच्युत उसगांवकर यांच्या पार्थिवाचे चिंबल येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले व श्रद्धांजली वाहिली.

ऍड. रमाकांत खलप
माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी उसगांवकर यांना श्रद्धांजली वाहताना ते मृदूभाषी व तत्वनिष्ठ असे नेते होते असे म्हटले आहे.

दिगंबर कामत
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनीही उसगाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.