महिलांसाठीची स्टेट सिलेक्शन चेस चँपियनशीप १३ पासून

0
100

जेसीआय सांतिनेझतर्फे तिसवाडी आणि गोवा चेस असोसिएशन तथा एसएजीच्या सहयोगाने आयोजित महिलांसाठीची ऑल गोवा स्टेट सिलेक्शन चेस चँपियनशीप येत्या दि. १३ ते १५ मे या कालावधीत सकाळी ९ ते ६ या वेळेत एसएजी कॉन्फरन्स हॉलमध्ये खेळविण्यात येणार आहे. या स्पधेंतील कामगिरीच्या निकषावर जूनमध्ये पेरियामेत, चेन्नई येथे होणार्‍या प्रतिष्ठेच्या नॅशनल वूमेन्स चॅलेंजर्स स्पर्धेसाठीच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. प्रथम दहा  क्रमाक विजेत्याना रोख पुरस्कार देण्यात येतील. ७, ९, ११, १३ आदि वयोगटातील  तसेच ग्रामीण भागातील विद्यालयातील खेळाडूनाही खास पुरस्कार देण्यात येतील. स्पर्धेंत भाग घेऊ इच्छिणार्‍यांनी आपल्या प्रवेशिका दि. ११मे पर्यंत स्वप्नील होबळे  (९८८१७७६६८९), विल्सन क्रूझ (९७६४१८५७४७),  संजय कवळेकर (९८२३२५८७११),अमोघ नमशीकर (९४२२४५५८९६), ऍड. पी. कंटक (९८२२५८३१८५) आणि दत्तराम पिंगे (९८२२१५७२०८)यांच्याकडे द्याव्यात.