महिलांना रात्रपाळी कामविरोधी निवेदन राज्यपालांना सादर

0
128

राज्यातील खासगी उद्योगांमध्ये महिलांना रात्रपाळीत काम करण्यास मान्यता देणार्‍या विधेयकाला विरोध करणारे निवेदन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने राज्यपालांना काल सादर केले.

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कंपनी (गोवा दुरुस्ती) विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकांमध्ये खासगी उद्योगामध्ये महिलांना रात्रपाळीत काम करण्यास मान्यता देण्याची तरतूद आहे. विधानसभेत या दुरुस्ती विधेयकांवरील चर्चेच्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधेयकाला विरोध केला होता.
राज्यातील खासगी उद्योग महिलांना संध्याकाळी ७ ते सकाळी ६ यावेळेत काम करण्यासाठी मान्यता घेतली जाऊ शकते. विधानसभेने संमत केलेले विधेयक मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविले जाणार आहे. या विधेयकाला मान्यता दिल्यास अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्यपालांना एक निवेदन सादर करून विधेयकाला मान्यता देऊ नये अशी विनंती केली आहे.