महामार्गावरील मद्यालयांबाबत न्यायालयाकडून महत्त्वाचे आदेश

0
82

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारुच्या दुकानांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महामार्गाच्या ५०० मीटर अंतरातील दुकानांना परवाना देणे बंद करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्रातील हे अंतर २२० मीटर इतके असणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली आहे.