महामार्गावरील अपघातात एक दुचाकीस्वार ठार

0
10

म्हापसा-पर्वरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता थिवी येथील अँथोनी सिकेरा (५५) यांचे म्हापसा-पर्वरी महामार्गावरील टिकलो पेट्रोल पंपनजीक दुचाकीवरील नियंत्रण गेल्यामुळे स्वयंअपघात घडला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने सिकेरा यांना गोमेकॉमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महिला उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस यांनी अपघाताचा पंचनामा केला.