महनीय, अतिमहनीय व्यक्तींसाठी दोन बुलेटप्रुफ वाहनांची खरेदी

0
9

राज्यात येणार्‍या महनीय व अतिमहनीय व्यक्तींना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी गोवा सरकारने दोन बुलेटप्रुफ गाड्या खरेदी केल्या आहेत. या गाड्या काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिष्टाचार खात्याकडे सुपूर्द केल्या.

राज्य सरकारकडे बुलेटप्रुफ गाड्या नसल्याने एखादी व्हीव्हीआयपी व व्हीआयपी व्यक्ती गोव्याच्या दौर्‍यावर आल्यास राज्य सरकारला कर्नाटक किंवा महाराष्ट्रातून भाडेतत्त्वावर बुलेटप्रुफ गाडी आणावी लागत असे. वर्षाला सरासरी ५०० व्हीव्हीआयपी व व्हीआयपी गोव्याच्या दौर्‍यावर येत असतात. राज्य मंत्रिमंडळाने गेल्या ऑगस्ट महिन्यांत ६५.९ लाख रुपये खर्च करून गोवा पोलिसांसाठी दोन गाड्या बुलेटप्रुफ बनवण्यासाठी रिट्रोफिटिंग करण्यास मान्यता दिली होती.

काल झालेल्या या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी गोवा पोलीस स्पेशल ब्रांच मॅन्युअल व पोलिसांसाठीच्या कॉफी टेबल बुकचे विमोचन केले. तसेच निर्भया योजनेखाली महिला पोलिसांना लॅपटॉपचे वितरण केले.