मराठी चळवळीतील शिलेदार विनायक नाईक यांचे निधन

0
131

मराठी चळवळीतील एक शिलेदार व माजी आमदार विनायक नाईक यांचे काल कोरोनाने निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने १० दिवसांपूर्वी त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली.

नाईक यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रांत भरीव कार्य केले. थिवी मतदारसंघातून १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची आमदार म्हणून निवड झाली. मगोपचे ते खंदे समर्थक होते. त्यांनी पीर्ण गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिले. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष, माजी कोषाध्यक्ष, पीर्ण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कोलवाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कळंगुट येथील विद्यानिकेतन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, नाथ पै स्मृती शैक्षणिक संस्थेचे सचिव, कोलवाळच्या महात्मा जोतिबा फुले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक म्हणूनही नाईक यांनी आजवर काम पाहिले. काल म्हापशात दत्तवाडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत पुत्र पराग यांनी त्यांना मंत्राग्नी दिला.