मनी लॉण्डरिंगप्रकरणी कामत, आलेमांववर आरोप निश्‍चित

0
55

उत्तर गोवा खास जिल्हा न्यायालयातर्फे जायकाप्रकरणी लुई बर्जर लाचखोरी प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा विद्यमान आमदार चर्चिल आलेमाव यांच्याविरोधात काल आरोप काल निश्‍चित केला आहे. दरम्यान, आमदार कामत आणि आमदार आलेमांव यांनी लाचखोरीच्या आरोपाचा इन्कार केला आहे. आमदार कामत आणि आमदार आलेमाव यांना आता खटल्याला तोंड द्यावे लागणार आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी २ ऑगस्ट रोजी होणार आहे. आपण न्यायालयासमोर स्पष्टीकरण केले आहे, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी म्हाटले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. जायका मलनिस्सारण प्रकल्पासाठी कामत यांनी १.२० कोटी, तर आलेमाव यांनी ७५ लाख रुपयांची लाच मागितली होती.

या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २१ जुलै २०१५ रोजी आलेमाव, जायकाचे अधिकारी आनंद वाचासुंदर, लुई बर्जर कंपनीचे अधिकारी जेम्स मॅकक्लुंग, सत्यकाम मोहांती, रायचंद सोनी, आर्थुर डिसिल्वा यांच्यासह आमदार कामत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ईडीने १२ जुलै २०१८ रोजी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.