मद्यपी चालकांवर कारवाई सुरू

0
19

>> पेडण्यात मद्यालयाबाहेर दोघे ताब्यात

मद्यप्राशन करून सुसाट वाहने हाकणाऱ्यांवर यापुढे करडी नजर ठेवण्याचा निर्णय काल गोवा पोलिसांनी घेतला आणि लगेचच कारवाईला सुरुवात केली. त्यासाठी मद्यालयांबाहेर साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात आले. त्यानंतर मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या दोघांना काल पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पेडण्यातील एका मद्यालयाबाहेर साध्या वेशातील पोलिसांनी ही कारवाई केली.

बाणस्तारी अपघातानंतर सरकारने मद्यधुंद सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. वाहतूक पोलिसांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यापुढे चालकांची अल्कोहोल मीटरद्वारे चाचणी केली जाईल, त्यात मद्यपान केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांची वाहने ताब्यात घेण्यात येतील व त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांची वाहने पर्यायी चालक येईपर्यंत रोखून धरली जातील.