मणिपूरमधील हल्ल्यात दोन जवान शहीद

0
5

काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या दोन्ही गटांमधील तणाव मिटविण्यात यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा केला होता. यानंतर काल मणिपूरमध्ये आसाम रायफल्स तुकडीच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात आसाम रायफल्स तुकडीतील दोन जवानांना हौतात्म्य आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. सायंकाळी 5.50 च्या सुमारास नंबोल सबल भागाजवळ आसाम रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.