मंत्रिपुत्र आशिष मिश्रा याला अटक व न्यायालयीन कोठडी

0
31

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी शनिवारी १२ तासांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. त्याला मध्यरात्रीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

तिथे न्यायदंडाधिकार्‍यांनी आशिषला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी लखीमपूर खीरी जिल्हा कारागृहात करण्यात आली.

पोलिसांनी आशिषच्या पोलीस कोठडीसाठी मागणी केली आहे. यावर आज ११ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उपेंद्र अग्रवाल यांनी, आशिषने पोलिसांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली नाहीत आणि तपासात सहकार्य केले नाही. त्याने योग्य माहिती दिली नाही, म्हणून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती दिली.
आशिष मिश्राकडे ३१५ बोअरचे परवाना असलेल्या शस्त्राची काडतूस असल्याचा संशय आहे. एसआयटीने प्रशासनाकडे फॉरेन्सिक टीमची मागणी केली आहे.