भेकेच्या गोलमुळे बेंगळुरूची बरोबरी

0
182

मुंबईकर राहुल भेकेने नोंदविलेल्या गोलमुळे बेंगळुरू एफसीने नॉर्थईस्ट युनायटेडला १-१ असे बरोबरीत रोखत हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या पर्वात काल वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या लढतीत गुण विभागून घेतले.

नॉर्थईस्ट युनायटेडचे खाते २७ व्या मिनिटाला आघाडी फळीतील पोर्तुगालचा २८ वर्षीय खेळाडू लुईस मॅचादो याने उघडले. नॉर्थईस्ट युनायटेडने मध्यंतरास ही आघाडी राखली. त्यानंतर दुसर्‍या सत्रात ४९व्या मिनिटाला बेंगळुरूला बचाव फळीतील भारताचा ३० वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू राहुल भेके याने बरोबरी साधून दिली.
बेंगळुरूने ११ सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून तीन विजय व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले, पण पाचव्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीला त्यांनी गुणांवर गाठले.
जमशेदपूरचा गोलफरक शून्य (१२-१२) आहे, तर बेंगळुरूचा उणे १ (१३-१४) असा आहे.