भू सुरुंग स्फोटात तीन जवान शहीद

0
170

नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले. ही घटना काल गुरूवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य दोन जवान जखमी झाले. या प्रकरणी सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोधमोहीम राबवित आहेत.

झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होयाहातू गावच्या वनक्षेत्रात हा स्फोट झाला. झारखंड जगुआर ऑफ स्टेट पोलिसांचे दोन जवान या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय सीआरपीएफची १९७ बटालियनचा देखील एक जवान जखमी झाला आहे. या स्फोटानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.