भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर

0
222

>> पहिली कसोटी ३ डिसेंबरपासून ब्रिस्बेनवर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याविषयी अजून निश्‍चित कळवलेले नसले तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी उन्हाळी मोसमाचे आपले वेळापत्रक काल गुरुवारी जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ च्या मोसमात भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांसह भारत, न्यूझीलंड आणि झिंबाब्वे विरुद्धची टी-ट्वेंटी आणि भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे सामन्यांचा समावेश आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याची सुरुवात टी-ट्वेंटी मालिकेने होईल.

त्यानंतर चार सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. या दौर्‍यावर टीम इंडिया पहिल्यांदा विदेशी मातीवर डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना ऍडिलेडच्या मैदानावर खेळला जाईल.

टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जाईल. ११, १४ आणि १७ ऑक्टोबर रोजी गब्बा, मनुका ओव्हल आणि ऍडिलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया-भारत दरम्यान टी-२० मालिका खेळली जाईल. त्यांनतर डिसेंबरमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होईल. सिडनी येथे भारतीय कसोटी मोहिमेच्या समाप्तीनंतर पर्थ स्टेडियमवर १२ जानेवारी रोजी वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येतील. त्यानंतर मेलबर्न (१५ जानेवारी) आणि सिडनीमध्ये (१७ जानेवारी) दौर्‍याचा अखेरचा सामना रंगेल.

ऑस्ट्रेलियाच्या अन्य
संघांविरुद्धच्या मालिका
अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी ः पर्थ स्टेडियम पर्थ, २१ ते २५ नोव्हेंबर, झिंबाब्वेविरुद्धची वनडे मालिका ः पहिला सामना, ९ ऑगस्ट, दुसरा सामना १२ ऑगस्ट, तिसरा सामना ः रिव्हरवे स्टेडियम टाऊन्सविल, १५ ऑगस्ट, न्यूझीलंड महिलांविरुद्ध तीन टी-ट्वेंटी मालिका ः तिन्ही सामने नॉर्थ सिडनी ओव्हल मैदानावर (२७ व २९ सप्टेंबर, २१ ऑक्टोबर), महिलांची टी-ट्वेंटी मालिका ः पहिला सामना ः रिव्हरवे स्टेडियम टाऊन्सविल, ५ ऑक्टोबर, दुसरा सामना ः कॅझले स्टेडियम केन्स, ७ ऑक्टोबर, तिसरा सामना ः मेट्रिकोन स्टेडियम गोल्ड कोस्ट, १० ऑक्टोबर, वेस्ट इंडीजविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका ः पहिला सामना ः रिव्हरवे स्टेडियम टाऊन्सविल ४ ऑक्टोबर, दुसरा सामना ः कॅझले स्टेडियम केन्स, ६ ऑक्टोबर, तिसरा सामना ः मेट्रिकोन स्टेडियम

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे उन्हाळी मोसमाचे वेळापत्रक
भारतीय पुरुष संघाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका ः पहिला सामना, गब्बा ब्रिस्बेन, ११ ऑक्टोबर, दुसरा सामना ः मनुका ओव्हल कॅनबेरा, १४ ऑक्टोबर, तिसरा सामना ः ऍडिलेड ओव्हल ऍडिलेड, १७ ऑक्टोबर, कसोटी मालिका ः पहिली कसोटी ः गब्बा ब्रिस्बेन, ३ ते ७ डिसेंबर, दुसरी कसोटी ः ऍडिलेड ओव्हल ऍडिलेड, ११ ते १५ डिसेंबर, तिसरी कसोटी ः मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड मेलबर्न, २६ ते ३० डिसेंबर, चौथी कसोटी (डे नाईट) ः सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी, ३ ते ७ जानेवारी, वनडे मालिका ः पहिला सामना ः पर्थ, १२ जानेवारी, दुसरा सामना ः मेलबर्न, १२ जानेवारी, तिसरा सामना ः सिडनी, १७ जानेवारी. भारतीय महिला संघाविरुद्धची वनडे मालिका ः पहिला सामना ः मनुका ओव्हल, कॅनबेरा, २२ जानेवारी, दुसरा सामना ः जंक्शन ओव्हल सेंट किल्डा, २५ जानेवारी, तिसरा सामना ः ब्लंडस्टोन एरिना होबार्ट, २८ जानेवारी.