भारताचे मिग-२९ विमान अरबी समुद्रात कोसळले

0
112

भारतीय नौदलाचे प्रशिक्षक मिग-२९के विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळले. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले असून दुसर्‍या वैमानिकाचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी सध्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सदर विमान दि. २६ रोजी दुर्घटनाग्रस्त झाले. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसर्‍या वैमानिकाचा हवाई तसेच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.