भाडेकरू पडताळणी न केल्यास 1 डिसेंबरपासून 10 हजारांचा दंड

0
6

गोवा भाडेकरू पडताळणी कायद्याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पोलिसांना भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांना आता 1 डिसेंबरपासून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. गृह खात्यातर्फे कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे.

राज्यात पोलिसांनी भाडेकरू तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे 2 लाख घरांतील भाडेकरूंची तपासणी पूर्ण झाली आहे. जे घरमालक भाडेकरूंची माहिती व कागदपत्रे पोलिसांना देत नाही, त्यांना 10 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यात आहे.

घरमालकांनी भाडेकरूंच्या ओळखपत्रांसह आवश्यक माहिती विहित अर्जामध्ये भरून नजीकच्या पोलीस स्थानकात द्यावी, अशी सूचना सरकारने यापूर्वीच दिली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासह गुन्ह्यांचा छडा लावणे शक्य व्हावे, या हेतूने हा कायदा सरकारने केला आहे.