भाजपाध्यक्ष नड्डा यांचे उद्या गोव्यात आगमन

0
96

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे उद्या शनिवार दि. २४ रोजी दुपारी गोव्यात आगमन होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आगामी विधानसभा २०२२ निवडणुकीसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दि. २४ व रविवार दि. २५ जुलै रोजी गोव्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

त्यांच्यासोबत सरचिटणीस बी. एल. संतोष, गोवा प्रभारी सी. टी. रवी यांची उपस्थिती असेल. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती बैठकीत निश्‍चित केली जाणार आहे. मंत्री, आमदार, प्रमुख नेते, पदाधिकारी यांना आगामी निवडणुकीसाठी प्रचारकार्य सुरू करण्याची सूचना केली जाण्याची शक्यता आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.