भाजपचे कार्यालय पश्‍चिम बंगालात पेटवले

0
75

पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच काल तेथील आरामबाग येथील भाजपचे कार्यालय पेटवण्यात आले. या प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसवर आरोप करण्यात आले असूनतृणमूलने हे आरोप फेटाळले आहेत. भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसकडून ह्या आगीसंदर्भातले आरोप फेटाळले जात आहेत.