सत्ताधारी भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया चालू असून काल पक्षाच्या 22 मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली. परवा शनिवारी दोन मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली होती तर आणखी 12 मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची निवड होणे बाकी असून ती लवकरच होणार असल्याची काल भाजपमधील सूत्रानी स्पष्ट केले. आतापर्यंत निवड झालेल्या मंडळ अध्यक्षांची संख्या 24 एवढी आहे.
काल 22 मतदारसंघातील निवड झालेले मंडळ अध्यक्ष खालीलप्रमाणे आहेत. फोंडा : हरेश सदानंद नाईक, दाबोळी : सचिन चौगुले, कुठ्ठाळी : सतीश पडवळकर, कुंकळ्ळी : कुणाल किशोर खोलकर, मांद्रे : उत्तम पोखरे, पेडणे : सिद्धेश पेडणेकर, म्हापसा : योगेश खेडेकर, शिवोली : मोहित चोपडेकर, पर्वरी : विनित परब, हळदोणा : रणजीत उसगावकर, पणजी : पुंडलिक ब्रिजेश शेट्ये, सांतक्रुझ : संदेश शिरोडकर, कुंभारजुवे : योगेश पिळगावकर, प्रियोळ : अनिशा आनंद गावडे, मये : संदीप पार्सेकर, साखळी : रामा नाईक, पर्ये : श्रीपाद गावस, वाळपई : रामू जानू खरवत, कुडचडे : मनोजकुमार नाईक, सावर्डे : कपील चंद्रकांत नाईक, सांगे : राजेश गावकर, काणकोण : प्रभाकर गावकर. परवा शनिवारी मुरगाव मंडळ अध्यक्षपदी अविनाश नाईक व फातोर्डा मंडळ अध्यक्षपदी श्वेता लोटलीकर यांची निवड झाली होती. तर साळगाव, थिवी, ताळगाव, कळंगुट, डिचोली, मडगाव, नावेली, केपे, कुडतरी, वास्को, शिरोडकर व सांतआंद्रे या मतदारसंघात भाजप मंडळ अध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. ती लवकरच होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
प्रदेशाध्यक्षांची निवड
महिन्याच्या शेवटपर्यंत
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्षाची महिन्याच्या शेवटपर्यत निवड होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजपच्या गाभा समितीने नरेंद्र सावईकर, दामू नाईक, दिलीप परूळेकर, दयानंद मांद्रेकर, दयानंद सोपटे व बाबू कवळेकर यांची नावे पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली आहेत.