ब्रेंडन, सुसाईराजची शिबिरासाठी निवड

0
238

भारतीय फुटबॉल संघाचे नूतन प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनी किंग्स कप फुटबॉल स्पर्धेपूर्वी नवी दिल्ली येथे २० मे पासून होणार्‍या तयारी शिबिरासाठी ३७ खेळाडूंची निवड केली आहे. थायलंडमधील बुरिराम येथे ५ ते ८ जून या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे. २०१८-१९च्या आयएसएल मोसमातील ब्रेंडन फर्नांडिस, राहुल भेके, मायकल सुसाईराजसह अनेकांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. दुखापतग्रस्त जेजे लालपेखलुआ, हालिचरण नार्झारे, मंदारराव देसाई, आशिक कुरुनियान, नरेंदर गेहलोत व जेरी लालरिनझुआला यांचा विचार करण्यात आलेला नाही.

भारतीय संघ ः गोलरक्षक ः गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदर सिंग, कमलजीत सिंग, बचावपटू ः प्रीतम कोटल, निशू कुमार, राहुल भेके, सलाम रंजन सिंग, संदेश झिंगन, आदिल खान, अन्वर अली, सुभाशिष बोस, नारायण दास, मध्यरक्षक ः उदांता सिंग, जाकिचंद सिंग, ब्रेंडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, रेनियर फर्नांडिस, बिक्रमजीत सिंग, धनपाल गणेश, प्रणॉय हल्दर, रॉवलिन बोर्जिस, जर्मनप्रीत सिंग, विनीत राय, सहाल अब्दुल, अमरजीत सिंग, रेदीम तलांग, लालियनझुआला छांगटे, नंदा कुमार, कोमल थाटल, मायकल सुसाईराज, आघाडीपटू ः बलवंत सिंग, सुनील छेत्री, जॉबी जस्टिन, सुमीत पस्सी, फारुख चौधरी व मानवीर सिंग.