बॅग भरो और निकल पडो

0
176

– सौ. प्रतिभा कारंजकर

समर व्हेकेशन किंवा उन्हाळी पर्यटन ही मुळ कल्पना परदेशातून आली असावी. त्यांच्याकडे थंडीत मायनस डिग्री टेम्प्रेचर असतं त्यामुळे कुठेही बाहेर जाता येत नाही तर काही ठिकाणी सर्वत्र बर्ङ्गच बर्ङ्ग! अशा ठिकाणी रोजच्या कामासाठीही बाहेर पडणं मुश्कील होवून बसतं. घरात, ऑङ्गिसात, गाडीत हिटर लावून वातावरण गरम करावं लागतं.

मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हटलं की आठवतो तो लहानपणीचा मामाचा गाव आणि तिथे घालवलेले सुट्टीचे दिवस! आजोबांचं ते कौलारू, मायेची सावली देणारं घर. घरासमोरचं तुळशी वृंदावन, शेणाने सारवलेल्या त्या अंगणात चांदण्या रात्रीची ती गप्पाटप्पांची बैठक, आंब्यांनी लगडलेला अंगणातला आम्रवृक्ष, झाडावरून अवचित पडलेला आंबा घेण्यासाठी भावंडांमधली शर्यत, आजीच्या हातचं गरमागरम जेवण. आजोबांच्या गोष्टीतली भूतं, मामा मावशीच्या मुलांबरोबरचा तो धांगडधिंगा, आंबे काजूचा रतीब, समुद्राच्या कोमट पाण्यात दिवसदिवसभर मारलेल्या डुबक्या आणि बरंच काही. त्यामुळे कधी एकदा सुट्टी लागते आणि मामाकडे जातो असंच आम्हा मुलांना वाटे.
पण आता ही परिस्थिती बदललीय. गावाकडे राहणारा मामा कुठेतरी शहरात वास्तव्याला असतो, त्याच्या घरी उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि लाईटचे लोडशेडिंग चालू असतं. गावाकडची मजा शहरात येत नाही. म्हणूनच काही पालक आता आपल्या मुलांना घेवून अशा ठिकाणी सुट्टी घालवण्याचा प्रयत्न करत असतात; जेणेकरून मुलांना गावची, गावच्या मातीची ओढ वाटली पाहिजे. तिथे आजोबा आज्जी राहात असले तर उत्तमच, पण नसले तरी एक आपल्या जीवनाला वेगळ्या शैलीत घेवून जाणारा ग्रामीण पर्यटनाचा पर्याय डोळ्यासमोर ठेवतात. आता तिथेही ङ्गार्महाऊस, कॉटेजेस अशासारख्या सोई असतात. बुकिंग करून तिथे जाता येतं. हिल-स्टेशन शिवाय आणखीही काही ठिकाणी जाता येतं. गोव्यातून जवळ असलेला कोकणचा किनारा, तारकर्ली, सिंधुदुर्ग, मालवण हे पर्याय जवळचे आणि चार पाच दिवसांची सुट्टी घालविण्यासारखे आहेत. शिवाय गोवन लोकांच्या आवडीचे मासे, आंबे, ङ्गणस हे ही भरपूर उपलब्ध असतात. त्यानंतर जरा दूर म्हणजे महाराष्ट्रात वाई, पांचगणी, महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे. ही गोव्याहून ङ्गार दूर नाहीत. शिवाय पणजीहून रोज महाबळेश्वरला एसटीची बस जाते. पण जाण्यापूर्वी सगळे बुकिंग व्यवस्थितपणे करून गेलेले बरे. बेळगाव जवळचे दांडेली येथेही जंगलात टुरिस्ट कॉटेजेस आहेत. तिथे मुलांना व मोठ्यांनाही आवडेल असं वातावरण आहे. चार दिवस शहरी जीवनापासून लांब, थोडं निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तो साध्य होऊ शकतो. मुख्य म्हणजे आपण एकत्रितपणे आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवू शकतो. त्यांच्याशी गप्पाटप्पा, हास्य विनोद होतात. बिनधास्त पणे गाणी, जोक यांची देवाणघेवाण होत असते. मुलांना ही जरा मोकळेपणा मिळतो, दंगामस्ती करायला. आईवडिलांकडे त्यांना देण्यासाठी वेळही मिळतो. मुलांकडेही सांगण्यासारखे बरेच असते पण रोजच्या आपल्या रुटीनमध्ये ते ऐकून घ्यायला ही वेळ ङ्गुरसत नसते. त्यांनाही त्यांचा अभ्यास, शाळा, क्लास, होमवर्क, वेळ उरला तर थोडासा खेळ, नाहीतर मोबाईलवरचे गेम यातच वेळ निघून जातो आणि आईबाबांचाही नोकरीवर, इंटरनेटवर, टीव्हीवर वेळ जात असतो. त्यामुळे बरेच दिवस मोकळेपणाने कुटुंबात संभाषण होऊ शकत नाही. त्यासाठी असं घराबाहेर पडून एकत्र राहणं, एकत्र मजा अनुभवणं गरजेचं असतं. एप्रिलमध्ये परीक्षांचा ङ्गिवर उतरलेला असतो, रिझल्टची उत्सुकता असते आणि त्याचवेळी उन्हाळ्याचा चटका जाणवू लागलेला असतो. अशावेळी ह्या उबगलेल्या वातावरणातून बाहेर पडून कुठेतरी चार दिवस का होईना निवांत क्षण अनुभवावे असं वाटणं साहजिकच आहे. एखाद्या हिल स्टेशनला जावसं वाटत असतं. शरीर आणि मनही थकलेलं असतं. अशा या खास उन्हाळी म्हणजे समर व्हेकेशनसाठी ङ्गिरायला जाण्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत पण आपण आपल्या खिशातल्या पैशाची ऊब आणि रजेची उपलब्धता यानुसार पर्याय निवडून त्याप्रमाणे व्यवस्थित आखणी केली पाहिजे. म्हणजे ते सहलीचे चार दिवस सुखाचे असतील. टूर प्लान करताना हवामानाचा विचारही लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जिथे जाणार आहोत तिथे जर जास्त तीव्र उन्हाळा असेल तर काय ङ्गायदा? म्हणून राजस्थानसारख्या ठिकाणाचा विचार न केलेला बरा. तिथल्या टूर थंडीतच केलेल्या बर्‍या. आपल्याला ज्या प्रकारच्या हवामानाची सवय असते तिच्याशी साम्य असलेल्या ठिकाणी गेलं तर लहान मुलांना त्रास होणार नाही तसेच प्रौढ लोकांच्या तब्येतीचा विचारही केला पाहिजे. चार दिवस आराम करायला जायचा मानस असल्याने दगदग न होता, पाहता येईल, मजा करता येईल असा पर्याय निवडणं चांगलं. पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरात जायचा विचार न केलेला बरा. कारण पाणी टंचाई आणि डेंग्यू, चिकन गुनिया इत्यादीची भीती. तेव्हा शक्यतो तिथला विचार न करणे बरे.
आता घरोघरी गाड्या असतात त्यामुळे कुठेही जाताना बस ‘बॅग भरो और निकल पडो’ अशी एखादी सोपी, सुटसुटीत ट्रीप आयोजित करता येते. हाताशी पुरेसा वेळ असेल तर दूरची स्थळे पहायला जायला हरकत नाही. केरळ हा ऑप्शन ङ्गारच चांगला आहे. निसर्ग रम्य केरळच्या प्रेमात पडला नाही असा पर्यटकच विरळा. दूरवर पसरलेले चहाचे मळे, डोळ्यांना गारवा देणारा हिरवाईने नटलेला निसर्ग, हिरवीगार भातशेती, बॅकवॉटर, बोटिंग, कॉङ्गी, वेलची यांची झाडे, मंदिरे, स्पाईस गार्डन इत्यादी सारंच पाहण्यासारखं. पण त्यासाठी रेल्वे किंवा विमानाचं आधी बुकिंग केलेले बरे. इतिहासाची आवड असेल किंवा मुले मोठी असतील तर हम्पी, हॉस्पेट, बदामी हा पर्याय चांगला आहे. पूर्वीच्या समृद्ध विजयनगरच्या साम्राज्याचे अवशेष बघायला मिळतात. तसं पाहिलं तर आपल्या देशात बघण्यासारखं बरंच आहे पण तिथे पर्यटकांसाठी सोई असतातच असं नाही. हैद्राबाद, म्हैसूर, बेंगलोर, उटी, कुर्ग हे जरा लांबचे पर्याय आहेत. आणखी एक महत्वाचे म्हणजे आपल्या मित्रालाही सहकुटुंब आपल्या सोबत घ्या. स्त्रियांना गप्पागोष्टीसाठी सोबत मिळते, मुलांनाही मित्राच्या मुलांची कंपनी मिळते. त्यामुळे आपल्या कुटुंबाला मॅच होईल असे कुटुंब बरोबर असणे एकदम बेस्ट. आपली मेव्हणी आणि साडू आणि त्यांची मुले हा आणखीन एक उत्तम पर्याय, मात्र ‘व्हेवलेंग्थ’ म्हणजे आवडीनिवडी जुळणार्‍या असाव्यात. सोबत कोणीही, कितीही जवळचा असो. खर्चाची विभागणी ‘सोल्जर सिस्टीमनेच’ करावी. या बद्दल ओशाळे वाटू देऊ नये.
हॉलिडेज म्हणजे कुटुंबासाठी एक पर्वणीच असते. समर हॉलिडेची हवा मात्र आधीच वाहू लागते आणि अशावेळी रेल्वे, विमान, बसेस, लॉज सगळीकडे बुकिंग ङ्गुल होते मग पंचाईत होते. आता इंटरनेटवर कुठूनही कुठलेही बुकिंग करता येते. ते करायला जमत नसले तर सरळ एखाद्या टूर कंपनीबरोबर जाणं चांगलं. म्हणजे ऐन वेळी होणारा त्रास वाचतो. तेच सगळं आपल्याला रेडीमेड देतात. तुम्ही ङ्गक्त पैसे भरायचे आणि तयारीला लागायचे. त्यांच्याबरोबर पाहताना, आपल्या डोक्याला कसलीही कटकट नसते. टूरमध्ये आणखीही लोक असल्याने कंपनी मिळते, ओळखी होतात, एकत्रितपणे सहल एन्जॉय करता येते.
उन्हाळी पर्यटन म्हटले की डोळ्यासमोर येतात गारेगार हवेतली बर्ङ्गाच्छादित हिमशिखरे. काश्मीर, सिमला, मनाली अशी नावे साद घालू लागतात. या भागात जायचे असेल तर उन्हाळ्यातच जावे लागते. कारण पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात इथल्या थंडी वार्‍याला आपण तोंडच देऊ शकणार नाही. उन्हाळ्यात मात्र हा परिसर हिरवाईने नटून जातो. हवामान ही सुखद थंड असते. निसर्गाने भरभरून दान दिले आहे ह्या प्रदेशाला. सिमला, कुलू मनाली, नैनिताल यासारखी ठिकाणे निसर्गरम्यतेसाठी लोकप्रिय आहेत. तिथल्या निसर्गावरचे बर्ङ्गाचे आच्छादन पाहून चित्तवृत्ती बहरून येतात. बर्ङ्गवृष्टी बघायला मिळणं ही एक आनंदाची पर्वणी असते. पण ही ट्रीप जरा जास्त दिवसांची आणि खर्चिक होऊ शकते. उन्हाळ्यातल्या तप्त जीवाची तगमग मात्र तिथल्या बर्ङ्गाच्या दर्शनानेच शीतल, गारेगार होवून जाते. तिथून परतून यावंसं वाटत नाही. गरमीने हैराण झालेल्यांना थंडगार वातावरणात, बर्ङ्गात मनसोक्त हॉलिडे एन्जॉय करता येण्यासारखी ही स्थळे आहेत.
दररोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनामध्ये कुठे तरी मस्त ब्रेक घेत आराम करावा हे प्रत्येकाला वाटत असतं, पण सगळ्यांनाच ते जमते असे नाही. पण मनापासून ठरवलं तर जमवता येतं. ‘इच्छा तेथे मार्ग’ हा मंत्र लक्षात घेवून त्या दृष्टीने तयारी केली तर पर्यटनाचा चांगला सुयोग्य मार्ग सापडू शकतो.
प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रवास म्हणजे एक नवीन, अवीट अनुभवाची मेजवानी असते. पूर्वीच्या काळी देवदेव करायला तीर्थक्षेत्र असेल त्या ठिकाणी लोक जात. गंगास्नान, कुंभ मेळा, जत्रा अशा ठिकाणी जाण्यात देवाच्या भक्तीबरोबरच नेहमीच्या आयुष्यात एक चेंज म्हणूनही पाहिले जात असेल. वारकरी पंढरपूर, आळंदीला एकत्रित पणे जातात तोही एक प्रकारचा सामुहिक पर्यटनाचा भाग म्हणावा लागेल. म्हणजे पर्यटन ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे अशी अनेक प्रयोजने आहेत. आपल्या रोजच्या सांसारिक कटकटीपासून दूर राहण्यासाठीचा एक उपाय असतो.
कुठलाही प्रवासी प्रवास करून परततो तेव्हा त्याच्यासोबत येते एक प्रवासातील अनुभवाचे गाठोडे आणि दरवेळी त्या गाठोड्यात भर पडते, अनुभवांनी ते संम्पन्न होत जाते, त्याबरोबर ज्ञानातही मोलाची भर पडते. म्हणून मुलांनाही यांच्या लहानपणापासून प्रवासाची आवड लावली पाहिजे. मग पुढे जावून ती आवड जोपासली जाते. असं म्हणतात ‘सिंधबाद जेव्हाजेव्हा सङ्गरीला जायचा तेव्हा दरवेळी परत येताना आपल्या बरोबर संपत्तीचा ठेवा घेवून यायचा’ तसाच आपल्या प्रवासा दरम्यान मिळणारा अनुभवांचा ठेवा ही एक संपत्तीच असते. पुढे कधीही त्या ठिकाणचे ङ्गोटो पाहिले, तिथली बातमी ऐकली, टीव्हीवर ते ठिकाण बघितलं गेलं की आपण म्हणतो ‘अरे, आपण इथे गेलो होतो. हे तर आपण पाहिलंय, हे आपण अनुभवलंय. म्हणजे आपल्या स्मृतीपटलावर कोरला गेलेला तो एक आलेख असतो. म्हणूनच पर्यटन करणं हे आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुम्हाला समृद्ध करत असतं. उन्हाळी सुट्टीतलं असो की हिवाळ्यातलं असो, तुम्ही समृद्धच होत असता. अनुभवांनी, जाणीवांनी, प्रवासात भेटणार्‍या माणसांनी, आणि तिथल्या स्वाद आणि श्रुतींनी!
समर व्हेकेशन किंवा उन्हाळी पर्यटन ही मुळ कल्पना परदेशातून आली असावी. त्यांच्याकडे थंडीत मायनस डिग्री टेम्प्रेचर असतं त्यामुळे कुठेही बाहेर जाता येत नाही तर काही ठिकाणी सर्वत्र बर्ङ्गच बर्ङ्ग! अशा ठिकाणी रोजच्या कामासाठीही बाहेर पडणं मुश्कील होवून बसतं. घरात, ऑङ्गिसात, गाडीत हिटर लावून वातावरण गरम करावं लागतं. पण समर म्हणजे सूर्याची कृपा, लख्ख उजेडाचा प्रकाशमय, ऊबदार दिवस! अशा वेळी त्यांना बाहेर पडावंसं वाटणं साहजिकच आहे. हीच वेळ असते त्यांच्यासाठी बाहेर जावून मजा करायची, सूर्यस्नान करायची! म्हणूनच आपल्या गोव्यातही इतक्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी येत असतात. आपल्याकडे रोजच आपली सोनेरी उबदार किरणे घेवून तो सूर्यदेव सकाळी सकाळी हजर असतो पण त्यांच्याकडे असा दिवस येणं भाग्याचं असतं, म्हणूनच ते एकमेकांना गुड मॉर्निंग करून विश करतात. एकूणच सूर्य देवाची आपल्यावर जशी कायम कृपादृष्टी आहे तशी त्यांच्यावर थोडेच दिवसांसाठी असते व ते दिवस म्हणजे समर सिझन म्हणून त्यांना त्याचे महत्व आणि कौतुकही जास्त वाटते. त्यांच्याप्रमाणे आपल्याकडेही उन्हाळ्यात सुट्टी असल्याने आपल्या समर व्हेकेशन सुरु झाल्या आहेतच. पोरांचे रिझल्ट्स ही हाती आले असतीलच तर मग वाट कसली बघता शाळा पुन्हा सुरु व्हायच्या आत, ताजेतवाने होण्यासाठी… ‘बॅग भरो और निकल पडो..!’