बुधवारी कोरोनाचे ८७ रुग्ण

0
162

राज्यात चोवीस तासांत नवीन ८७ कोरोना रुग्ण आढळून आले असून एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६५७ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८६५ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ७५६ एवढी आहे.
राज्यातील आणखी ८४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ०३६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ५८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन २५ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासांत १८०२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४.८२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.