बुधवारी कोरोनाचे २०० नवे रुग्ण

0
155

>> सध्याच्या रुग्णांची संख्या १५५६

राज्यात काल बुधवारी कोरोनाचे नवे २०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८३० एवढी झाली आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५८,०३९ एवढी झाली आहे. तसेच सध्याच्या रुग्णांची संख्या १५५६ एवढी झाली आहे.

काल राज्यात ६२ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५५,६५३ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८९ टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

दरम्यान, काल खात्यातर्फे २३५२ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोना संसर्ग झालेल्या १६,४६८ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ३१,३१२ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ५,४४,६५२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक रुग्ण मडगावात
दक्षिण गोव्यात सर्वाधिक रुग्ण मडगावात असून त्यांची संख्या १७३ एवढी झाली आहे. तर उत्तर गोव्यात सर्वाधिक रुग्णसंख्या १६५ एवढी पणजीत झाली आहे. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने २०३ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ३६ जण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.

आजपासून लसीकरण
संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातही आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविडची लस देण्यासाठीची मोहीम आजपासून सुरू होणार आहे. सध्या राज्यात ७५ हजार लसी उपलब्ध आहेत अशी माहिती काल मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बांदेकर यांनी दिली. राज्यातील सरकारी इस्पितळे व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ही लस देण्यात येणार आहे.

ऑनलाइन नोंदणी
४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी लेुळप.र्सेीं.ळप या सरकारी वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल. या वेबासाइटवर दिवसाला १ कोटी नोंदणी स्वीकारल्या जातात. नोंदणी झाल्यानंतर लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळते. कोरोनावरील लस घेण्यासाठी आपण ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. तसेच ज्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही असे नागरिक कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे नोंदणी करून लस घेऊ शकतात. परंतु यासाठी अशा व्यक्तींना दुपारी ३ वाजल्यानंतरच केंद्रावर जाता येईल.