बीआरडीएसच्या कारवाईमुळे केबल वाहिनी सेवा बंद

0
107

राज्यातील केबल टीव्हीवाहिनी (सिग्नल) सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली असून ती सुरू करण्यासाठी सरकारने बीआरडीएसला शुक्रवारी संध्याकाळपर्यंतची मुदत दिली होती. ही केबल सेवा तात्काळ सुरू करण्यास जर बीआरडीएसला अपयश आले तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा काल उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांनी दिला.
प्रुडंट, ३६५, आरडीएक्स, इन गोवा या सर्वच केबल वाहिन्यांचे सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहे.
वरील वाहिन्यांची सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद राहिल्याने राज्यभरातील सुमारे ३० हजार ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.
टीआरएआयच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या कारणाखाली केबलवाहिन्यांना कसलीही संधी न देता एकतर्फी निर्णय घेत बीआरडीएसने राज्यातील सर्व केबल वाहिन्यांचे सिग्नल तोडले आहेत.