बिगर भाजपशासित राज्यांकडून इंधन कर कपात

0
19

>> महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, राजस्थानमध्ये इंधनाचे दर आणखी घटले

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्यानंतर आता बिगर भाजपशासित राज्यांच्या सरकारांनीही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्रासह, केरळ, ओडिशा व राजस्थानमधील राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅट कमी केला आहे. परिणामी या राज्यांमध्ये पेट्रोल जवळपास अडीच रुपये, तर डिझेल दीड रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने मागच्या वर्षी ज्यावेळी इंधन कर कपात केली होती, त्यावेळी या राज्यांनी मात्र कर कमी केले नव्हते.
शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलवरील कर ८ रुपयांनी, तर डिझेलवरील कर ६ रुपयांनी कमी केला होता. त्यामुळे पेट्रोल ९.५० रुपयांनी, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावा, असे आवाहन केले होते.
राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात ८ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ६ रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते.
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात कपात केल्यानंतर केरळ सरकारने व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. शनिवारी केरळ सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट अनुक्रमे २.४१ रुपये आणि १.३६ रुपये प्रति लिटरने कमी केला.
तसेच राजस्थान सरकारने इंधनावरील व्हॅट घटवल्याने पेट्रोल २.४८ रुपयांनी आणि डिझेल १.१६ रुपयांनी स्वस्त झाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यामुळे राज्य सरकार पेट्रोलवरील व्हॅट २.४८ रुपये आणि डिझेलवर १.१६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहे. त्यामुळे या राज्यात पेट्रोल १०.४८ रुपयांनी आणि डिझेल ७.१६ रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय, ओडिशा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर अनुक्रमे २.२३ रुपये आणि १.३६ रुपये प्रति लिटरने कमी केला. या कपातीनंतर ओडिशात पेट्रोलची नवीन किंमत १०२.२५ रुपये आणि डिझेल ९४.८६ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातही इंधन कर कपात
केंद्राने कर कपात केल्यानंतर राजस्थान, केरळ व ओडिशाने आपापल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारवरही दडपण होते. त्यानंतर काल सायंकाळी पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकराने घेतला. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कर कपात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे, तर डिझेल दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोल १०९ रुपये २७ पैसे, तर डिझेल प्रति लिटर ९५ रुपये ८४ पैसे मिळणार आहे.