बार्टीचे प्रथम स्थान कायम

0
101

विंबल्डनच्या ‘अंतिम १६’मध्ये गारद होऊनही ऍश्‍ले बार्टी हिने डब्ल्यूटीए क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. इवोन गुलागोंग कावली (१९८०) हिच्यानंतर विंबल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू होण्याचे स्वप्न भंग पावल्यानंतरही फ्रेंच ओपन विजेत्या बार्टीच्या अव्वल स्थानाला तुर्तास धोका नाही. बार्टीला नुकत्याच संपलेल्या विंबल्डन स्पर्धेत ऍलिसन रिस्के हिच्याकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. नाओमी ओसाका व कॅरोलिना प्लिस्कोवा ही दुकली दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी कायम आहे. सेरेना विल्यम्सला हरवून विंबल्डन विजेेतेपद पटकावलेल्या सिमोना हालेपने चार स्थानांची उडी घेत तिसरा क्रमांक आपल्या नावे केला आहे. सेरेनाने एका क्रमांकाने वर सरकताना नववे स्थान प्राप्त केले आहे. विबल्डनच्या दुसर्‍या फेरीत बाहेरचा रस्ता धरावा लागलेली माजी क्रमांक एकची खेळाडू अँजेलिक कर्बर ‘टॉप १०’च्या बाहेर फेकली गेली आहे. भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास अंकिता रैना (-१, १७२वे स्थान), करमन थंडी (-१४, २८८) यांची घसरण झाली आहे.

डब्ल्यूटीए टॉप १० ः १. ऍश्‍ले बार्टी (ऑस्ट्रेलिया, ६६०५), २. नाओमी ओसाका (जपान, ६२५७), ३. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ६०५५), ४. सिमोना हालेप (रोमानिया, ५९३३), ५. किकी बर्टेन्स (नेदरलँड्‌स, ५१३०), ६. पेट्रा क्विटोवा (झेक प्रजासत्ताक, ४७८५), ७. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ४६३८), ८. स्लोन स्टीफन्स (अमेरिका, ३८०२), ९. सेरेना विल्यम्स (अमेरिका, ३४११), १०. आर्यना सबालेंका (बेलारुस, ३३६५).