बारावीचा निकाल ८९.२७ टक्के

0
187

>> वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९२.८२ टक्के निकाल

>> एकूण १५३३९ उत्तीर्ण

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी इयत्तेचा निकाल ८९.२७ टक्के एवढा लागल्याची माहिती काल मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना दिली. कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शाखेत मिळून एकूण १७१८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १५३३९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा सर्वात जास्त म्हणजेच ९२.८२ टक्के एवढा निकाल लागला. त्या मागोमाग सर्वांत जास्त म्हणजेच ८८.९६ टक्के एवढा निकाल विज्ञान शाखेचा लागला. व्यावसायिक शाखेचा निकाल ८८.९१ टक्के एवढा लागला. सर्वांत कमी म्हणजे ८५.३० टक्के एवढा निकाल कला शाखेचा लागला आहे.

वाणिज्य शाखेत ५३६२ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४९७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून ४८२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक शाखेतून २८२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २५०९ जण उत्तीर्ण झाले. तर सर्वांत कमी निकाल लागलेल्या कला शाखेतून ४१७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मोजके विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल खालीलप्रमाणे आहे. कला शाखेत ३४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ३७.२४ टक्के एवढी आहे. वाणिज्य शाखेला २२० विद्यार्थी बसले होते. त्यातील ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ४३.६४ एवढी आहे. विज्ञान शाखेला २८६ एवढे विद्यार्थी बसले होते त्यापैकी १२८ जण उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ४४.७६ एवढी आहे. व्यावसायिक शाखेत ९१ जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४१ जण उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ४५.०५ एवढी आहे.

या परीक्षेत ७५ टक्क्यांवर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी (प्रमाण) १५.७१ एवढी आहे. ६० ते ७४ टक्के एवढे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ३८.०३ एवढी आहे. ४५ ते ५९ एवढी टक्केवारी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ३७.५७ एवढी आहे. तर ३५ ते ४४ टक्के एवढे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७२ टक्के एवढी आहे.

१४७ विद्यार्थी क्रीडा
गुणांच्या आधारे उत्तीर्ण
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४७ विद्यार्थी हे क्रीडा गुणांच्या आधारे उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ०.८१% एवढी आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकून पडल्याने २३ मे रोजी झालेल्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांना बसता आले

धेंपोसह पाच उच्च माध्यमिक विद्यालयांचा १०० टक्के निकाल
धेंपो विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयासह एकूण ५ उच्च माध्यमिक विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागलेला असून त्यात डॉ. के. बी. हेडगेवार या कुजिरा येथील एकमेव सरकारी अनुदानीत उच्च माध्यमिक विद्यालयाचा समावेश आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या अन्य उच्च माध्यमिक विद्यालयात जुने गोवे येथील सेंट झेव्हियर्स, तसेच पणजीतील मुष्टीफंड आर्यन व विशेष मुलांसाठीच्या लोकविश्‍वास प्रतिष्ठान उच्च माध्यमिक विद्यालयाचा समावेश आहे.

यंदाही मुलींचीच बाजी
दर वर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून परीक्षेला बसलेल्या मुलींची उत्तीर्ण होण्याची आकडेवारी ही ९०.९४ एवढी आहे. यंदा परीक्षेला ९००४ मुली बसल्या होत्या. त्यापैकी ८१८८ जण उत्तीर्ण झाल्या. परीक्षेला बसलेल्या मुलांचा आकडा हा ८१७९ एवढा होता. त्यापैकी ७१५१ जण उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ८७.४३ एवढी आहे.