बायडननी घेतली अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

0
195

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी काल बुधवारी अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर विराजमान होणार्‍या हॅरिस या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकन आणि आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
शपथविधी कार्यक्रमाला कोरोना महामारीमुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. केवळ एक हजार जणांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सुरक्षेसाठी जवळपास २५ हजाराहून अधिक जवान तैनात करण्यात आले होते.

अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी स्थानिक वेळ १२ वाजता ज्यो बायडन यांना शपथ दिली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा शपथविधी पार पडला. अमेरिकेतील प्रमुख वृत्तवाहिन्यांवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले होते.
या शपथविधी सोहळ्यात गायिका-नृत्यांगना लेडी गागा यांनी राष्ट्रगीत गायिले. तर, अमांडा गोरमॅन यांनी एक खास कविता वाचून दाखवली.