बाबरकडून होती शतकाची अपेक्षा

0
108

पाकिस्तानचा उदयोन्मुख खेळाडू बाबर आझम याने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४८.७५च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह १९५ धावा जमवल्या असल्या तरी भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रा मात्र त्याच्या कामगिरीवर समाधानी नाही. विराट कोहलीसारख्या दिग्गजाशी तुलना होत असताना बाबरकडून किमान एका शतकाची तरी अपेक्षा होती. सध्याच्या काळातील ‘फॅप फोर’मध्ये स्थान मिळविण्याची कामगिरी त्याने या दौर्‍यात केली नाही. आझम इंग्लंड दौर्‍यात आपल्या लौकिकाला जागला नसल्याचे मत चोप्रा याने व्यक्त केले.

असद शफिक, फवाद आलम व नसीम शाह यांनी पुरती निराशा केल्याचे चोप्रा याने पुढे बोलताना सांगितले. आकाश चोप्राने शान मसूदला १० पैकी ६.५ गुण देताना त्याने शानदार सुरुवातीप्रमाणे शेवटही गोड केला असता तर अधिक समाधान झाले असते, असे म्हटले. चोप्राने मोहम्मद रिझवान याच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली. इंग्लंडमधील वातावरणात यष्टिरक्षण करणे कठीण असताना रिझवानने दाखवलेली चपळता अद्वितीय होती. फलंदाजीत १६१ धावा व यष्टिमागे सहा बळी ही त्याची कामगिरी सर्वांत उठून दिसली, असे चोप्रा म्हणाला.