बाप्पाचे आगमन पावसातच

0
38

>> शुक्रवारपर्यंत राज्यात जोरदार पाऊस

राज्यात शुक्रवार दि. १० सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन पावसातच होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मंगळवार दि. ७ ते शुक्रवार दि. १० सप्टेंबरपर्यंत राज्यात दमदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काल दिवसभरात राज्यात सर्वत्र जोरदार सरी कोसळल्या.
हवामान खात्याने मंगळवारी राज्यात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला असून, आज राज्यातील काही भागात जोरदार पाऊस, तर काही भागांत अतिवृष्टीची शक्यता असल्याचे खात्याने म्हटले आहे. दि. ८ ते दि. १० रोजी पर्यंत हवामान खात्याने राज्यात यलो अलर्टचा इशारा दिलेला आहे. काल सोमवारी राज्यातील काही भागांत दमदार पाऊस झाला. राजधानी पणजीसह मडगाव शहरातही सायंकाळच्या जोरदार सरी बरसल्या. काही भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली.