बांगलादेश विजयी

0
201

तमिम इक्बाल व लिट्टन दास यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने काल आयर्लंडने विजयासाठी ठेवलेले २९३ धावांचे लक्ष्य ४३ षटकांत गाठले. पॉल स्टर्लिंग (१३०) व विल्यम पोर्टरफिल्ड (९४) या द्वयीच्या शानदार फलंदाजीवर आरुढ होत आयर्लंडने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २९२ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यापूर्वीच आव्हान आयर्लंडचे स्पर्धेतील आव्हान आटोपले होते. त्यामुळे या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते. १७ रोजी विंडीज व बांगलादेश यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

आयर्लंडचा कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पोर्टरफिल्ड व स्टर्लिंग यांच्यात तिसर्‍या गड्यासाठी झालेली १७४ धावांची भागीदारी वगळता दुसरी मोठी भागीदारी या डावात झाली नाही. बांगलादेशकडून अबू जायेद याने ५८ धावांत ५ गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या आघाडी फळीने चांगली फलंदाजी केली. तमिम व दास यांनी केवळ १७ षटकांत संघाला ११७ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. शाकिब अल हसन (५०) याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.