बनावट टीआरपी रॅकेट उघड

0
239

>> एकूण तीन वाहिन्यांचा समावेश, मुंबई पोलिसांची माहिती

मुंबई पोलिसांनी खूप मोठा टीआरपी घोटाळा उघड केला आहे. यात एकूण तीन चॅनेलचा समावेश अअसल्याची धक्कादायक माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल मुंबी येथे दिली.
या प्रकरणी दोन चॅनेलच्या चालकांना अटक करण्यात आली असून त्यांचकडून ८ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचार्‍यांच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. यात पैसे देऊन रेटिंग वाढवण्यात आल्याचे पुराव्यांनिशी समोर आले आहे. विशिष्ट चॅनेल घरात लावण्यासाठी पैसे दिले गेल्याचेही तपासात आढळल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले.

याप्रकरणी चौकशी सुरू असून सदर चॅनेलच्या संचालकांना समन्स बजावणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांना आज अटक करण्यात आली असे अधिकार्‍याने सांगितले. या रॅकेटतर्ंगत प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले जायचे असे पोलिसांनी सांगितले.