बंगालच्या कुंडूला ‘ब्लिट्‌झ’चे जेतेपद

0
204

>> गोमंतकीय खेळाडूंची प्रभावी कामगिरी

अखिल भारतीय पहिल्या ऑनलाईन ब्लिट्‌झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पश्‍चिम बंगालच्या कस्तुव कुंडू याने पटकावले. बाणावली चेस क्लब व फातोर्डा पॅरेंट्‌स चेस क्लब यांनी सासष्टी तालुका बुद्धिबळ असोसिएशन व चेस. कॉम यांच्या संलग्नतेखाली ही स्पर्धा आयोजित केली होती.

कुंडू याने ९ फेर्‍यांअंती ७.५ गुणांची कमाई केली. तामिळनाडूचा दिनेश राजन दुसर्‍या व प्रणेश एम. तिसर्‍या स्थानी राहिला. फिडे मास्टर नितीश बेलुरकर (७वे स्थान), रित्विज परब (१०वे स्थान), अमेय अवदी (१५वे स्थान), पार्थ साळवी (विसावे स्थान) यांनी आघाडीच्या २५ खेळाडूंत स्थान मिळवले. अनिरुद्ध पार्सेकर, इथन वाझ, साईरुद्र नागवेकर व विवान बाळ्ळीकर हे सर्वोत्तम गोमंतकीय ठरले.

फातोर्डा पॅरेंट्‌स चेस क्लबच्या चार सर्वोत्तम खेळाडूंचा पुरस्कार विनायक साळुंके, सागर शेट्टी, साईनी देसाई व वेदांत पै यांना प्राप्त झाला.

या स्पर्धेत एकूण ११० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमन, इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदी, फिडे मास्टर नितीश बेलुरकर यांचा समावेश होता. गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, उपाध्यक्ष आशिष केणी, सदस्य संजय बेलुरकर यांनीदेखील ऑनलाईन बुद्धिबळाचा आनंद लुटला.