बँकांना देणार ७० हजार कोटी : सितारमण

0
102

>> भारताची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा दावा

देशात सुरू असलेल्या मंदीच्या वातावरणाला तोंड देण्यासाठी सरकारने अखेर पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी तब्बल ७० हजार कोटींचे पॅकेज तसेच ‘कॅश फ्लो’ वाढवण्यासाठी ५ लाख कोटी देणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काल केली. तसेच आरबीआयच्या रेपो दराच्या कपातीचा थेट ङ्गायदा ग्राहकांना व्हावा यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे गृह, वाहन आणि उद्योगांना देण्यात येणारे कर्ज स्वस्त होणार असल्याचा विश्वास सीतारामण यांनी व्यक्त केला. जगभरात मंदीचे वातावरण असून इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

मंदी आली आहे, अर्थव्यवस्था ढासळली आहे अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे. मात्र, मंदी ङ्गक्त भारतात नाही तर जगभरात आहे. जगातल्या बहुतांश देशांना मंदीचा सामना करावा लागतो आहे. जगाचा अभ्यास करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल, असा टोला विरोधकांना निर्मला यांनी लगावला.

जगाची अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. देशात व्यवहार करणे आता सोपे झाले आहे. आर्थिक सुधारणेची प्रक्रिया बहुतांश प्रमाणात ऑटोमॅटिक झाली आहे. जीएसटीची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम वेगाने सुरू आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा हा सरकारचा पहिला अजेंडा आहे, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.