फोंडा ते भोमा रस्त्यासाठी 557 कोटींचा निधी मंजूर

0
6

केंद्र सरकारने फोंडा ते भोमा या 9.6 किलोमीटर लांबीच्या चारपदरी महामार्गासाठी 557 कोटी मंजूर केले आहेत. या प्रकल्पामुळे पणजी आणि फोंडा यांच्यातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि पुढे बेळगावपर्यंत विस्तार होईल. हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे आभार मानले आहेत.